बोलकी पाने
- मृण्मयी सारंग
- Mar 24, 2023
- 2 min read

'पुस्तक' हा शब्द आपण लहानपणीपासून ऐकतो हो न! पुस्तकांच माणसाच्या आयुष्यात अनन्यासाधारण महत्व असतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुस्तक आपल्या सोबत असतातं.अगदी लहान मुलांनपासून ते वृद्धांनपर्यत प्रत्येकाजवळ पुस्तक नावाचा मित्र असतो. पुस्तकांना काळाची , वयाची मर्यादा नसते. ते प्रत्येक काळातं तितकेचं महत्वाचे आणि गरजेचे असतात. माणसाच्या मनातील विचारांना शब्दाचे रूप मिळते आणि ते रूप नटवून जगासमोर आणण्याचे काम हे पुस्तक करत असतात. अमुक एका विषायावरच पुस्तक असत किंवा काही ठरावील विषयांवर पुस्तके उपब्लध आहे अस नसत. जगातल्या , मनातल्या प्रत्येक विषयावर पुस्तक आपल्याला मिळतात.
"खरा मित्र पुस्तक", "वाचालं तर वाचालं", "पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया" यांनसारखी अनेक वाक्य सुविचार आपण ऐकत असतो. लहान मुलांसाठी करमणूक म्हणून तर मोठ्यांसाठी ज्ञानार्जन आणि आवड म्हणून पुस्तकांचा वापर आपण करतो. पुस्तक हे फक्त चार कागद जोडून तयार केलेला कागदांचा गठ्ठा इतकचं नसत. ते आपल्याला खूप काही शिकवत असतात. ज्ञान देण्यापासून ते आयुष्यातीलं अनेक प्रश्नांवरचे उत्तर देण्याचे काम पुस्तक करत असतो. पुस्तक हा माणसानी स्वत:साठी आणि इतरांनासाठी तयार केलेला खनिजा आहे जो कधीच रिकामा होतं नाही. विशेष म्हणजे हा खजिना कधीही चोरीला जात नाही. जो कोणी हा चोरण्याचा प्रयत्न करतो तो ह्याच्या प्रेमात पडून ह्यात भर टाकून जातो.
पुस्तकांचाही आपल्या माणसांसारखा इतिहास आहे बरं का.... पुस्तक आपल्याला समृद्ध करता करता स्वत:ही समृद्ध होत गेली आणि काळाच्या गतीला साथ देत सतत नवीन रुप धारण करते गेली. सुमारे ५००० वर्षांनपुर्वी नाईल नदीच्या किनारी उगवणाऱ्या पपायसा झाडाच्या सालींपासून ह्या पुस्तकांचा जन्म झाला. इजिप्तशियन लोक ह्या साली एकत्र करून लिहू लागले. हळूहळू ताम्रपत्र ,कागद ते आता इंटरनेट असा पुस्तकांचा प्रवास होत गेला. पुर्वी ताम्रपत्रांवरील लिखावट काळाची गरज म्हणून कागदावर उतरविण्यात आली आणि आता परत त्याचं काळाच्या मागणी वरून कागदाच्या पुस्तकाचे इ- पुस्तकात रुपांतर झाले. रूप बदलली असली तरी त्याचे महत्वा मात्र कायम राहीले आहे. आपण माणसे रहाण्यासाठी घर बांधतो मात्र डॉ. बाबासाहेबं आबंडेकरांनी त्यांच्या पुस्तक प्रेमापोटी पुस्तकांच राजगृह बांधल. माणसांनी दुर लोटल्यावर ह्याच पुस्तकांनी त्यांनी जवळ केले . १८ -१८ तास पुस्तक घालविणारे ते एकमेव व्यक्ती असावे.
मात्र पुस्तक जसे मित्र तसेच शत्रू देखील होवू शकतात जर नको त्या विचारांची पुस्तके आपण वाचली तर... त्यासाठी वाचन करताना ज्ञान मिळेल असे वाचन करावे . महापुरुषांच लेखन वाचल की सम्यक दृष्टी तयार होईल, सम्यक दृष्टी निर्माण झाली की सम्यक विचार तयार होतील व सम्यक विचार तयार झाले की सम्यक आचरण घडेल व त्यातुन एक आदर्श असा समाज निर्माण होईल.पुस्तकांमुळे आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते. ही बोलकी पाने कायमचं आपल्याला काही न काही देत आली आहेत कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता. "देणाऱ्याने देत जावे" ही ओळं पुस्तकांनी कायमचं आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे.
Comentários