top of page
Search

इमोटीकॉन्स, प्रतिक्रिया.. कमी होतायत का भावना?

  • प्राजक्ता बर्वे
  • Mar 24, 2023
  • 2 min read

इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप आणि मेसेंजर (उगाच अन्न, वस्त्र आणि निवारा वाला फील येत असेल..... तर तो येऊ द्यात कारण एक वेळेस जेवण विसरू पण हे तीन नाही!!.😂😂) या वर एक नवीन फीचर आलय. आपण पाठवलेल्या मेसेज वर प्रतिक्रिया देण्याचं. म्हणजे हास्यास्पद मेसेज असेल तर पुर्वी आपण इमोटीकॉन्स टाकायचो मेसेज म्हणून. हल्ली त्या मेसेज वरच प्रतिक्रियादेता येते.

फार पूर्वी माणूस हातवारे करून बोलत असे. नंतर चित्र रेखाटून दाखवत असे. पुढे भाषेचा शोध लागला. माणसं एकमेकांशी भाषेच्या माध्यमातून बोलू लागली. दूर देशी राहणाऱ्या (इथे देश म्हणजे परदेश या अर्थी नसून वेगळा प्रांत या अर्थी) आपल्या जीवलगांना पत्रातून संदेश देऊ लागली. मग टेलिफोन आला. शहरं जवळ आली. कनेक्ट वाढला. मोबाईल च्या येण्यानी तर संपर्क साधणं सोप्पं होईल अशी आशा होती. पत्राची जागा आता टेक्स्ट मेसेज नी घेतली. कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त निरोप पोहोचविण्यासाठी एसएमएसच्या वेगळ्या भाषेची ची निर्मिती झाली. इंटरनेट चं जाळं पसरलं आणि इमेल्स येऊ लागले. @google.com सगळ्यांना माहीत झालं. मग आल्या सोशल नेटवर्किंग साईट्स जसं की ऑर्कूट, फेसबुक. मोठ्ठं वाटणारं जग आता आणिक जवळ आलं. सॅनफ्रानसिस्कोत राहणारा स्मिथ सदाशिव पेठेतल्या सोहमचा "फ्रेंड" झाला. ऑर्कूट बंद झालं, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप जन्माला आले. आणि जग होतं त्यापेक्षा अधीक जवळ आलं. सगळं एका क्लिक वर आलं पण आता, "ठीके रे, बोलू परवा" ची जागा ttyl नी घेतली, कट्ट्यावरच्या खळखळून हसण्याचं रूपांतर lol, rofl, ते अगदी वाकडी मान करून हसणार्‍या इमोटीकॉन मधे झालं. थोडक्यात चित्रांमधून भावना व्यक्त करणारा आदिमानव ते इमोटीकॉनच्या माध्यमातून व्यक्त होणारा टेक्नो-मानव... प्रगती झाली?? का आपण चक्रात अडकलो?

आईनी मायेनं, डोक्यावरून हात फिरवून, "काय ग.. नीट जेवलीस ना?" हे विचारणं आणि झोमॅटो अॅप च्या " You've not eaten in a while, order something and get 25%off" यात तुलना होऊच नाही शकंत.

या सगळ्यात मरण पावतायत त्या "भावना".

कमी होत चाललंय माणसातलं माणूसपण.

आपल्याला या माध्यमांमूळे प्रतिक्रिया देण्चीाय सवय लागलीये आणि कुठेतरी "वाटणं" कमी होत जातंय. ज्या मित्रांशी तासंतास लँडलाईन वरून बोलायचो आज त्यांनी पाठवलेल्या मीम्सवर फक्त प्रतिक्रिया देतोय..

एखादी गोष्ट आवडली नसतांना, संपूर्ण न पाहता/वाचता लाईक करतोय.

या सगळ्यापेक्षा जेव्हा सोसायटीतल्या आजी म्हणतात ना, "अगं तू गच्चीत डान्स शूट करत असतांना मी माझ्या खिडकीतून पाहीलं. मस्त नाचतेस ग" ते मनाला जास्त भावतं कारण त्यात शब्द असतात, चेहऱ्यावरील हाव भाव असतात, आवाजाचा उतार चढाव असतो आणि सगळ्यात महत्वाच्या भावना असतात.


 
 
 

Recent Posts

See All
वाट काढत पुढे चला

अगदी परवाचीच गोष्ट. मी बस मध्ये चढले आणि बसला खूप गर्दी होती. कंडक्टर काकांनी टिकीट दिलं आणि मी त्यांना म्हंटलं, "काका मी इथूनच उतरू का,...

 
 
 
प्रेक्षक (तरी) कुठे काय करतात...!

मुळातच नुसतं समाज माध्यमं म्हणजेच अगदी शुद्ध मराठी भाषेत 'सोशल मीडिया' हा खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. त्याची व्याप्ती, आशयघनता, त्याचा...

 
 
 

Comments


bottom of page