top of page
Search

प्रेक्षक (तरी) कुठे काय करतात...!

  • स्वर्णिमा प्रकाश
  • Mar 24, 2023
  • 3 min read

मुळातच नुसतं समाज माध्यमं म्हणजेच अगदी शुद्ध मराठी भाषेत 'सोशल मीडिया' हा खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. त्याची व्याप्ती, आशयघनता, त्याचा आपल्या सर्वसामान्यांनाच्या आयुष्यावर होणारा परिणाम (चांगला आणि वाईट असे दोन्ही) असे बरेच कंगोरे याला आहेत. यावर बरेचदा अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून भाष्यही झालं आहे, पण बहुदा ते 'तज्ज्ञ' व्यक्तीकडून झाल्यामुळे आपल्या सारख्या सर्वसामान्यांनपर्यंत पोहोचलं नसावं.

असो! तर आज असं अचानक, अगदीच out of nowhere या विषयाला हात घालण्यामागचं कारण म्हणजे आज सकाळी Instagram स्क्रोल करत असतांना "आई कुठे काय करते" या 'जगप्रसिद्ध' आणि 'लोकप्रिय' मालिकेचा नवीन प्रोमो दिसला.

(आता मालिका जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय असल्यामुळे यातील सगळी 'पात्र' आपणास ठाऊक आहेत असं मी गृहीत धरते.)

त्यात अनघाच्या डोहाळेजेवणाच्या दिवशी अभिचं म्हणजे तिच्या नवर्‍याचं 'लफडं' (सॉरी जरा स्पष्टच बोलतेय..) तर हो, लफडं आणि तरी अगदीच सुसंस्कृतपणे सांगायचं झालं तर 'extra marital affair' असल्याचं तिला कळतं. आणि हे सगळं बघून मला खूऽऽप basic प्रश्न पडला आहे - आयुष्यात extra marital affair सोडल्यास करण्यासारखं आणि दाखवण्यासारखं काही उरलंच नाहीया का!? आणि जर affairsच करायची असतील तर मग लग्न तरी का करायची आहेत यांना!? नका करू! लफडीच करा!

खरंतर खूप नवीन आणि आगळावेगळा विषय घेऊन ही मालिका आपल्या सगळ्यांसमोर आली होती. सुरुवातीला अगदी सगळ्या realistic अशा गोष्टी दाखवल्या. नुसत्याच realistic च नाही तर relatable सुद्धा! पण मग आता अचानक इतका दर्जा का घसरला यांचा? एकतर मुळातच खूप आधीच ही सिरियल बंद व्हायला हवी होती, पण ठिक आहे. मग मालिका वाढवायचीच आहे तर किमान काहीतरी चांगलं दाखवाना! नुसत्या extra marital affairs च्या भरवश्यावर एखादी मालिका इतकी कशी काय चालू शकते!? खरंतर यात कुठेतरी आपणही चुकतो असं मला वाटतं. (आपण म्हणजे प्रेक्षक या अर्थानी म्हणतेय) कारण काय बघायचं आणि काय नाही बघायचं हे ठरवणं आपल्या हातात असतं. जे आपल्याला बघायला आवडतं तेच समोरची व्यक्ती आपल्याला दाखवत असते. इतकं साधं सरळ गणित आहे हे. मग आपली चव इतकी बिघडली आहे का की आपण relaxation म्हणून दुसर्‍याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स चवीचवीने बघतो आहोत!? का? कशासाठी? इतके 'tragic प्रेमी' झालेलोत का आपण सगळे की यावर आक्षेप न घेता जे दाखवतील ते बघत बसलोय!

बरं त्यातल्यात्यात 'अरुंधती' being a heroine of the show तिचा आयुष्यात तर लेखकाने प्रॉब्लेम्सची लड लावलीच आहे पण कालांतराने प्रत्येक character च्या मागे प्रॉब्लेम्सचे फटाके लावलेत! मी असं म्हणत नाहीये की सिरियल आहे तर सगळं goody- goody दाखवा, पण म्हणून इतके प्रॉब्लेम्स! Seriously? एकही character असं नसेल ज्याच्या आयुष्यात यांनी प्रॉब्लेम्स दाखवले नसतील. अगदी अप्पांपासून विमलपर्यंत सगळे झालेत! आणि of course हे सगळे प्रॉब्लेम्स सोडवण्याची जबाबदारी अरुंधती वर. का? तर ती "आई" आहे म्हणून.

Come on!! तिला तुम्ही आई म्हणून portray करताय ना.. मग एखादी आई तिच्या घरासाठी जे जे करेल तेच अरुंधतीही करते आहे. मग यात इतकं glorify करण्यासारखं काय आहे? आणि मुळातच आपण सगळ्यांनीच एक खूप महत्त्वाची गोष्ट जाणली पाहिजे आणि लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक 'अरुंधती' च्या आयुष्यात "आशुतोष केळकर" येत नाही. बरेचदा आहे ती परिस्थिती स्विकारून 'अनिरुद्ध' सोबतच रहावं लागतं , संसार करावा लागतो.

खरंतर आईने घरासाठी घेतलेले कष्ट जे सहसा appreciate केले जात नाही, किंवा त्याबाबत फारसं काही बोललं जात नाही, ती जे काही करते ते तिचं "कर्तव्यच" आहे असं म्हणून जे तिला underestimate केलं जातं त्याबद्दलची ही मालिका होती असं मला वाटतं. त्यामुळे of course her struggle was real.

पण झालं ना आता! झाली ती तिच्या पायांवर उभी. बस झालं आता! बाकी unnecessary track कशाला वाढवायचा?

जनजागृती साठी म्हणून सुरू झालेली ही मालिका आता नको तितकी जागृती करायला लागली आहे, त्यामुळे on a serious note हे कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. मला काही या मालिकेतल्या कुठल्याच व्यक्तीला अगदी पडद्यावरच्या काय किंवा पडद्यामागच्या काय..कोणालाच दोष द्यायचा नाही आहे. पण माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की समाज माध्यमांचा नको तितका पगडा आपल्या सगळ्यांवर असल्याने त्याचे समाजात विपरीत परिणाम पण होऊ शकतात...नव्हे ते होतातच आहेत. मालिकेत एखादी गोष्ट चालते ना मग खऱ्या आयुष्यात का नाही? असं म्हणून नको ते अती normalize व्हायला लागलं आहे, जे आपण सगळ्यांनी अगदीच सहज स्विकारलं आहे. आणि खरंतर हेच आपल्याला करायचं नाहीये. त्यामुळे यासगळ्याचाच अगदी genuinely आणि खूऽऽप seriously विचार करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं.

Because it's high time now! We all need to choose our form of entertainment wisely!

[मी अगदी सुरुवातीपासूनच आपण, आपल्याला असं म्हणतेय. त्यामुळे त्यात मी सुद्धा येते. आणि दुसरं असं की - परत एकदा अधोरेखित करते की मी कोणालाच दोष देत नाहीय कारण तेवढी माझी पात्रताच नाहीया. फक्त काहीतरी मेजर चुकतंय असं मला वाटलं म्हणून व्यक्त झाले.]


सदर लेखातून कोणत्याही व्यक्ती, संस्था,राष्ट्रीयत्व, व्यावसाय, लिंग, वर्ग, जात, धर्म, यांच्या भावना दुखण्याचा अथवा अवमान करण्याचा कुठलाच हेतू नाही. पण असं चुकून झालंच , चुकून भावना दुखावल्या गेल्याच तर त्याला निव्वळ योगायोग न मानता असं का झालं याचा तटस्थपणे विचार व्हावा ही नम्र विनंती.

धन्यवाद.


 
 
 

Recent Posts

See All
वाट काढत पुढे चला

अगदी परवाचीच गोष्ट. मी बस मध्ये चढले आणि बसला खूप गर्दी होती. कंडक्टर काकांनी टिकीट दिलं आणि मी त्यांना म्हंटलं, "काका मी इथूनच उतरू का,...

 
 
 

Comments


bottom of page