top of page
Search

वाट काढत पुढे चला

  • प्राजक्ता बर्वे
  • Mar 30, 2024
  • 1 min read

अगदी परवाचीच गोष्ट. मी बस मध्ये चढले आणि बसला खूप गर्दी होती. कंडक्टर काकांनी टिकीट दिलं आणि मी त्यांना म्हंटलं, "काका मी इथूनच उतरू का, मला लगेच दोन stop नंतर उतरायचंय" त्यावर काकांनी म्हंटलं, " असं कसं इथून उतरू देऊ? कदाचित पुढे कोणी चढणार नाही पण चढलंच तर? तुम्ही तुमची वाट काढत पुढं चालंत रहा. तुमचा स्टॉप येईपर्यंत तिकडं पोहोचाल".

मी वाट काढलीच पण डोक्यात विचारांचं चक्र सुरू राहीलं. माणूस म्हणून आपण आपला comfort zone फार स्वेच्छेने सोडत नाही. आपल्याला आपली कुठलीही कामं सहजतेने, स्वतःच्या शरीराला तोशिष न पडता झालेली आवडतात पण शेवटी कसंय की आयुष्य इतकं सरळ, साधं आणि सोप्पं नसतं. Comfort zone तोडावाच लागतो. वाट कधीच मखमली फुलांनी सजवलेली नसते. ती सर करूनच ध्येयापर्यंत पोहोचावं लागतं. ध्येयापर्यंत पोहोचेतोवर अनेक अडचणी येतात, आपण थकतो, कंटाळतो, धडपडतो, चिडतो अगदी रडारडी सुध्दा होते आणि राडे सुध्दा होतात. या सगळ्यातून "वाट" काढत जाणं, आणि बरेचदा ती आपोआप सापडंत जाणं, थोडक्यात पुढे चालत राहणं महत्वाचं आहे. 

त्यादिवशी सुध्दा मी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहोचले आणि खाली stop वर उतरले तेही चतुराईने "वाट काढंत"

कुठला अनुभव तुम्हाला काय शिकवून जाईल.. काही सांगता येत नाही!!...नाही का?



 
 
 

Recent Posts

See All
प्रेक्षक (तरी) कुठे काय करतात...!

मुळातच नुसतं समाज माध्यमं म्हणजेच अगदी शुद्ध मराठी भाषेत 'सोशल मीडिया' हा खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. त्याची व्याप्ती, आशयघनता, त्याचा...

 
 
 

Comments


bottom of page