स्वप्नातले तराणे
- भार्गवी बाबरेकर
- Mar 24, 2023
- 1 min read
कधी तरी तुझ्या स्वप्नात यावे वाटते..
स्वप्नात हरवलेल्या तुला मनमुक्त पहावे वाटते..!
स्वप्नातल्या समुद्र किनारी हातात घेवूनी हात..
वाळूवर अलगद तुझे नी माझे, नाव लिहावे वाटते..!
ती कोवळी उन्हे तुझ्यातून पाझरताना..
तुझ्याच साठी गर्द प्रीतीची सावली व्हावे वाटते..!
असे वाटते तुझ्यात गुंतून जावे आता..
मग गुंताण्याहून अधिक , मिसळून जावे वाटते..!
वाटते खूप काही तुझ्याशी बोलावे..
पण मौनातूनच संवादाची भाषा व्हावे वाटते..!
Comentarios