top of page
Search

ये जवानी है दिवानी!!!

  • प्राजक्ता बर्वे
  • Mar 24, 2023
  • 1 min read

साल 2009-2010, रविवार चा दिवस, गृहपाठ करून झालेला, वेळ साधारण सकाळी 11-11.30 ची, स्थळ आमचा hall

मी तारक मेहता का उल्टा चष्मा बघत बसले आहे... पुढे जेठालाल चं काय होईल, मुसीबत का सामना आखिर करेगा कैसे, भीडे, अय्यर उसे मदत करेंगे... अरे आज रविवार आहे ना... आई काय बरं करेल आज खायला? Sunday special...इत्यादि विचार मनात डोक्यात सुखाने नांदतायत...

Cut 2 scene 2

साल 2022, रविवारचाच दिवस (किंवा खरंतर कुठलाही दिवस घ्या ना...हल्ली सगळे सारखेच वाटतात), वेळ तीच, स्थळ आमची bedroom, tv वर तारक मेहताच्या जुन्या episodes चं broadcast चाललंय..मी लावलंय खरं पण डोक्यातले विचार मला ते enjoyच करू देत नाहीये... काय होईल पुढे? जेठालाल च्या नव्हे.. माझ्या आयुष्यात! करीअर, नोकरी, entrances, interview, relationships, breakup, patchups... असे अनेक विचार मनात अक्षरशः हैदोस घालत फिरत होते....

तेव्हा एक जोरदार realization झालं... की आपण आता छोटे राहीलेलो नाही... मला मोठ्ठंऽऽऽ व्हायचंय, मोठी झाल्यावर ना मी हे-हे करेन... बर्वे ताई आली आता ती वेळ... खरंच झालो यार आपण मोठ्ठे...

लहानपणी ना खूऽऽऽप भारी वाटायचं आई बाबांना decisions घेतांना बघीतलं की... ते एकदम super heroes वाटायचे... जे कधीच चुकायचे नाहीत... पण आज जेव्हा मला काही अत्यंत महत्त्वपूर्ण decisions स्वतः, कुणाच्या मदतीशिवाय घ्यावे लागतात तेव्हा "आटे-दाल का भाव" कळतो, कळतं की decisions चुकले की त्याची जबाबदारी ही आपल्याला घ्यावी लागते, आणि पदोपदी आई-बाबा superheros नसून normal adults आहेत हे जाणवतं...

Adult life हे जरा... जरा नव्हे खूप तारेवरची कसरत करून घेणारं आहे... एकावेळीस अनेक "मुसीबतो का सामना करना पडता है" आणि तेव्हाच तारक मेहता बघतांना डोक्या असंख्य विचार चालू असले तरी आधी funny वाटणारं जेठालाल चं आयुष्य आता मात्र relatable ultra pro max वाटतं... आणि कुठेतरी हास्याच्या लकीरीसोबंतच हलकं सुध्दा वाटून जातं, हेच खरं...

 
 
 

Recent Posts

See All
वाट काढत पुढे चला

अगदी परवाचीच गोष्ट. मी बस मध्ये चढले आणि बसला खूप गर्दी होती. कंडक्टर काकांनी टिकीट दिलं आणि मी त्यांना म्हंटलं, "काका मी इथूनच उतरू का,...

 
 
 
प्रेक्षक (तरी) कुठे काय करतात...!

मुळातच नुसतं समाज माध्यमं म्हणजेच अगदी शुद्ध मराठी भाषेत 'सोशल मीडिया' हा खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. त्याची व्याप्ती, आशयघनता, त्याचा...

 
 
 

Comments


bottom of page