अजून
- रेणुका देशपांडे कुकडे
- Mar 24, 2023
- 1 min read
भरली उरी जखम जरी, व्रण अजून आहे..
व्यूहातून विजयाचा पण अजून आहे..
विलग मने, विलग दिशा..
विलग जरी प्रभा, निशा..
तुझिया संस्मरणांचे सण अजून आहे..
विरली जरी किलबिल,
सुकल्या जरी बागा..
सभोवती हे मुजोर तण अजून आहे..
अरुण निघे परताया..
घुटमळती संध्याछाया..
पाठीवर ओझ्यांचे मण अजून आहे..
अणू रेणूंचे माजले रण अजून आहे..
व्यूहातून विजयाचा पण अजून आहे..
Comments